शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘नो एन्ट्री’मध्ये आपले सहर्ष स्वागत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरातील एकेरी वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, एकेरी वाहतुकीचा नियम मोडणाºया वाहन चालकांना आता दुहेरी दंड बसत आहे. नो एन्ट्रीच्या प्रवेशद्वाराजवळ न थांबता सावज हेरण्यासाठी पोलिस आतमध्येच उभे राहात असल्याने वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.साताºयात गेल्या तीन वर्षांपासून एकेरी वाहतूक सुरू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरातील एकेरी वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, एकेरी वाहतुकीचा नियम मोडणाºया वाहन चालकांना आता दुहेरी दंड बसत आहे. नो एन्ट्रीच्या प्रवेशद्वाराजवळ न थांबता सावज हेरण्यासाठी पोलिस आतमध्येच उभे राहात असल्याने वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.साताºयात गेल्या तीन वर्षांपासून एकेरी वाहतूक सुरू आहे. नागरिकांनाही आता एकेरी वाहतूक अंगवळणी पडली आहे. शहरात इन मीन दोन रस्ते आहेत. राजपथावर जाण्यासाठी एखाद्याला वळसा घालून जावे लागते. त्यामुळे अनेक वाहनचालक शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात. ज्या ठिकाणी प्रवेश बंद असतो. त्या ठिकाणी पोलिस नसल्यामुळे संबंधित वाहनचालक आपले वाहन घेऊन जात असतो. परंतु मध्येच कोठेतरी पोलिस उभे असतात. नेमका सावज सापडत असल्याने पोलिसांनाही याची सवय झाली आहे. मात्र, यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्याचा मूळ उद्देश बाजूला राहात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी नो एन्ट्रीच्या प्रवेशद्वाराजवळच उभे राहावे, एकाही वाहन चालकाला तेथून सोडू नये. हळूहळू वाहन चालकांना शिस्त लागेल. मात्र, सावज पकडून आर्थिक भुर्दंड करण्यापेक्षा पोलिसांनी वाहतुकीची शिस्त लावावी, अशीही मागणी सातारकरांमधून होत आहे.नो एन्ट्रीतून एखाद्या वाहन चालकाने प्रवेश केल्यास त्याला दुहेरी दंड केला जातो. एक नो एन्ट्रीतून प्रवेश केल्याचा आणि दुसरा परवाना नसल्याचा. दुपारच्या सुमारास पोलिस नसल्याचे पाहून अनेकजण नो एन्ट्रीतून आपले वाहन नेत असतात. यातून पोलिसांची क्रेनही सुटली नाही. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले नो एन्ट्रीची फलक केवळ नावापुरतेच उरले आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस